संघ-भाजप ‘नियती’शी केलेल्या ‘करारा’चा भंग करून, जो ‘नवीन करार’ आणू पाहत आहेत, तो भारतीय समाजाच्या ‘चैतन्यतत्त्वा’शी विसंगत आहे!           

भाजप शासनकाळात आधुनिकतेच्या मूल्यांशी प्रतारणा करून भारतीयांना ‘मध्ययुगीन’ मानसिकतेकडे वळवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहे. संघ-भाजपने त्यांच्या सांप्रदायिक जातीय पुरुषसत्ताक कॉर्पोरेट हिंदुत्वाच्या परिकल्पनेला जनसामान्यांची अधिमान्यता मिळवून खरोखर भारतात ‘आव्हान-विरहित अधिसत्ता’ स्थापन केली आहे का? त्याचे उत्तर मिळवण्यासाठी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागेल.......

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सत्याचा अपलाप आहे. त्याच्या निर्मितीमागील भावना शिव म्हणजे कल्याणकारक नाही. त्यामुळे एक कलाकृती म्हणून त्यात सौंदर्य नाही!

हा एक राजकीय चित्रपट आहे, असे विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोण कोणाचा प्रचार करत आहे, हे समजण्यासाठी बुद्धीवर अधिक जोर देण्याचीदेखील आवश्यकता नाही. मग राजकारणासाठी आपल्या देवतांचा असा वापर केल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षक आक्षेप का घेत नाहीत? दिग्दर्शकाची दृष्टी स्वार्थामुळे विकृत झाली आहे. त्यामुळे त्याने एक आभासी विश्व निर्माण केले आहे जे वास्तवापासून दूर आहे.......

गांधींची हत्या एका व्यक्तीने नव्हे, विकारग्रस्त अशा एका विचारसरणीने केली. जेव्हा जेव्हा ती विचारसरणी द्वेषाचा अंधकार पसरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गांधींचा संदेश दिव्याप्रमाणे तो अंधार दूर करण्यासाठी नेहमीच अवतीर्ण होतो

गांधींची हत्या एका व्यक्तीने नव्हे, तर विकारग्रस्त अशा एका विचारसरणीने केली. नथुराम गोडसे त्या विकारग्रस्त विचारांनी प्रभावित होऊन बिर्ला हाऊसमध्ये पोहोचला आणि प्रार्थनेसाठी निघालेल्या गांधींवर तीन गोळ्या झाडू शकला, ते समाज म्हणून आपल्या सर्वांचे अपयश होते. ती विचारसरणी द्वेषावर आधारीत आहे. परंतु गांधींच्या हत्येशी जोडली गेल्यामुळे नकळत तिच्यावर गांधींच्या प्रेमाच्या संदेशाचा अंकुश कायमचा बसला आहे.......

प्रा. कसबे यांनी संशोधनपद्धतीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनेक निष्कर्ष निराधार आहेत. या पुस्तकात परस्परविरोधी विधानांची उधळण आहे

रावसाहेबांचा गांधींवरील अभ्यास अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे गांधीविचारांचा ज्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याकडून हस्तलिखित तपासून घेणे आवश्यक होते. जागतिक कीर्तीचे लेखकदेखील ही प्रक्रिया पूर्ण करतात. या पुस्तकाचा सर्वांत मोठा दोष म्हणजे रावसाहेब स्वतःशीच प्रामाणिक नाहीत. ते कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा सर्वांना खूष करण्याची कसरत करताना दिसतात. हे राजकारण्यांचे काम असते, संशोधकाचे नव्हे.......